कृष्ण संगिनी विषयी
कृष्ण ही हिंदू धर्मियांचे कलाप्रेमी देवता आहे. गीतेतील काव्य असो, गोकुळातील रास नृत्य असो, किंवा बासरीतील सुमधुर संगीत असो कृष्णाचे कला प्रेम हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे या उपक्रमास हे दिलेले नाव अतिशय योग्य ठरते.
कृष्ण संगिनी हा उपक्रम अशाच सर्व कलाप्रेमी लोकांसाठी आहे. असे असंख्य कलाप्रेमी लोक आहेत, जे आपल्या दैनंदिन जीवनाच्या व्यापामुळे किंवा संधी न मिळाल्यामुळे, आपल्या कलेपासून दूर गेले आहेत. त्यांना पुन्हा एकदा या रंगमंचामार्फत ती संधी उपलब्ध करून देण्याचा कृष्ण संगिनीचा मानस आहे.
या उपक्रमामार्फत सर्व कलाप्रेमी मंडळींना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देणार आहोत. ज्यावर ते आपले विविध कला गुण सादर करू शकतील. या उपक्रमांतर्गत आपण वैयक्तिक आणि समूहनृत्य, गायन, वादन, कथाकथन, एकपात्री अभिनय आणि अनेक नामवंत कवी आणि कवयित्रींचे कवितावाचन असे विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम आपल्या समूहातील आणि समूहाशी निगडित असलेल्या कलावंतांसाठी घेत आहोत.